दोडामार्ग :प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भेडशी खालचा बाजार आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर साटेली-भेडशी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सहकार्याने ‘श्रीगणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान-२०२६’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर दामोदर सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिरात परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिरानंतरही गरजूंसाठी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत रोगनिदान, आवश्यक शस्त्रक्रिया, रक्त तपासणी, ई.सी.जी. (ECG) व इतर वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या कार्यक्रमाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष नंदकिशोर टोपले, गौरीश वेटे, संतोष भिसे, आनंद काणेकर, पत्रकार सुहास देसाई, गणपत डांगी, डॉ. रामदास रेडकर, आरोग्य निरीक्षक सूरज बनसोडे, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक प्रमोद तळणकर, आरोग्यसेविका श्रीम. सुतार, श्रीम. गावडे, तसेच आशा स्वयंसेविका प्रणिता मयेकर आदी मान्यवर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
फोटो












