भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
वैभववाडी l प्रतिनिधी : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपच्या वतीने गणेश विसर्जनानंतर वैभववाडी येथील गणेश घाटाची स्वच्छता करण्यात आली.
वैभववाडी शहरातील घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन शनिवारी उत्साहात पार पडले. विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विसर्जनानंतर घाट परिसरात मोठ्या प्रमाणात फुले, निर्माल्य तसेच प्लास्टिकचा कचरा अस्ताव्यस्त पडला होता. भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत संपूर्ण घाट परिसराची स्वच्छता केली. घाटावर जमा झालेला कचरा व निर्माल्य संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत भाजप मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती सौ. साची कोलते, महिला तालुका अध्यक्ष सौ. प्राची तावडे, नगराध्यक्ष सौ. श्रद्धा रावराणे, सरचिटणीस संजय सावंत, सरचिटणीस रितेश सुतार, संजय रावराणे, मंगेश लोके, प्रदीप रावराणे, प्रदीप नारकर, शिवाजी राणे, रणजीत तावडे, पुंडलिक साळुंखे, सुभाष रावराणे, कु. नेहा माईनकर, महेश संसारे, स्वप्नील धुरी, संतोष पवार, संजय चव्हाण, प्रकाश शेलार, अनंत नेवरेकर, समाधान जाधव, दीपक माईनकर, श्रेयश नेवरेकर, दाजी पाटणकर, छोटू रावराणे, सुनील रावराणे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.












