भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आडेली गणात अंगणवाडी सेविका व मदतनीसांना साडी व साहित्य वाटप..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आडेली पंचायत समिती सदस्य तथा ओबीसी मोर्चा भाजपाचे उपजिल्हाप्रमुख श्री. नितीन मांजरेकर यांच्या माध्यमातून आडेली पंचायत समिती गणात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या वाढदिवसानिमित्त परिसरातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना साड्या व इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाद्वारे श्री. रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी श्री. नितीन मांजरेकर यांनी श्री. सोमेश्वर चरणी प्रार्थना करून श्री. रवींद्र चव्हाण यांना दीर्घायुष्य, निरोगी व सुखी आयुष्य लाभावे आणि त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीस व मनोकामना पूर्ण होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमास सौ. यशस्वी कोंडसकर सरपंच आडेली, श्री. तात्या कोंडसकर भाजप बूथ अध्यक्ष,श्री. मारुती वाघे, श्री. उत्तम धरणे, श्री. सुधीर धुरी ग्रामपंचायत सदस्य, आडेली, श्री. अविनाश तोरसकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष, श्री. प्रवीण गडेकर सामाजिक कार्यकर्ते, श्री. जक्कुलवाड गुरुजी, श्रीयुत आरोलकर, अंगणवाडी सेविका व मदतनीसांमध्ये सौ. अश्विनी जामदार, सौ रीती सोनसुरकर, सौ नीता सोनसुरकर, सौ प्राची वाघे, सौ माधुरी वाघे, सौ प्रणाली धरणे, सौ कांचन शेणई, सौ उमा शेणई, सौ समीक्षा एरम, सौ स्वाती पावस्कर, सौ नेत्रा होडावडेकर, सौ संचिता सुकळवाडकर, सौ. पेडणेकर आणि सौ तारामती गवस उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी मिळून प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.