आ. रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात

सावंतवाडी : महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात सावंतवाडी विधानसभा भाजपाच्या वतीने अंध, अपंग व दिव्यांग बांधव-भगिनींना आधाराच्या काठ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून सामाजिक कार्यातून मिळणारे खरे समाधान अनुभवायला मिळाले. समाजातील गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, केतन आजगांवकर धिरेंद्र म्हापसेकर सिद्धार्थ भांबूरे गोविंद साटेलकर बंटी जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे कार्य असेच अविरत सुरू राहावे, हीच या उपक्रमामागची भावना आहे.