कोकण चे भाग्यविधाते खासदार नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद घेऊन अमित कदम यांची ‘Mr. World’ तयारीला सुरुवात !

फोंडाघाट : सिंधुदुर्गच्या मातीतून बॉडीबिल्डिंग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे अमित अनिल कदम यांनी आगामी Mr. World स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यापूर्वी त्यांनी खासदार नारायण राणे साहेबांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. राणे साहेबांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनातून नव्या जिद्दीने स्पर्धेची तयारी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आज खासदार नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद घेऊन तयारीची नवी सुरुवात केली आहे. भारताचा तिरंगा आणि सिंधुदुर्गचे नाव जागतिक मंचावर अभिमानाने उंचावण्यासाठी पूर्ण ताकदीने मेहनत करणार आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना खासदार नारायण राणे साहेबांची मिळालेली मदत आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन. असे अमित कदम यांनी सांगितले..

मर्यादित सुविधा आणि अनेक अडचणींवर मात करत अमित कदम यांनी राष्ट्रीय तसेच जागतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. Mr. युनिव्हर्स 2026 मध्ये रौप्यपदक मिळवत भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता Mr. World 2027 साठी ते सज्ज होत आहेत. सिंधुदुर्ग आणि कोकणचे नाव शरीरसौष्ठवाच्या मंचावर पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

त्यांचा प्रवास स्थानिक युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारावर सातत्यपूर्ण सराव करत त्यांनी यश मिळवले. ‘मूलभूत प्रशिक्षण, मेहनत आणि शिस्त’ या तत्त्वांवर त्यांनी आपल्या कारकिर्दीची वाटचाल केली आहे. आगामी स्पर्धेसाठी शरीरसौष्ठव, आहार आणि प्रशिक्षणावर विशेष भर दिला जाणार आहे. आवश्यक सुविधा, आधुनिक उपकरणे आणि प्रायोजकांचे सहकार्य या तयारीत महत्त्वाचे ठरणार आहे.अमित कदम यांच्या तयारी मुळे सिंधुदुर्गच्या या खेळाडूकडून जागतिक मंचावर आणखी एका दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.