सुख-शांती मंडळाच्या अध्यक्षपदी सुजय कदम

सचिवपदी तेजस सावंत, खजिनदारपदी हर्षल रावले; 

सन २०२६-२८ साठी नूतन कार्यकारिणीची निवड

शिरगाव (प्रतिनिधी) :          देवगड तालुक्यातील साळशी-सरमळेवाडी येथील सुख-शांती मंडळाच्या सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुजय कदम, सचिवपदी तेजस सावंत, सहसचिवपदी राजेंद्र साटम, तर खजिनदारपदी हर्षल रावले यांची निवड झाली.

मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री सत्यनारायण पूजा सभामंडपात अध्यक्ष अमित रावले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी कार्यकारिणी सदस्य म्हणून साईनाथ लाड, चेतन कदम, स्वप्निल गावकर, भूषण कदम व समीर लाड, तर सल्लागार म्हणून संतोष कदम व अनंत पवार यांची निवड करण्यात आली.

सभेत वाडीच्या विविध विषयांवर सविस्तर विचारविनिमय करून सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचे उपस्थित सभासदांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या माध्यमातून वाडीच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या सभेला मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.