पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ २०२६ – महाराष्ट्र ” या अंतर्गत कार्यक्रम
वेंगुर्ले : दाजी नाईक
पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ २०२६ – महाराष्ट्र ” या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन वेंगुर्ले येथे कृषीभूषण आबासाहेब उर्फ रमाकांत मुकुंद कुबल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेंगुर्ला यांच्या वतीने दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे करण्यात आले आहे.
देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेला अनुसरुन, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६ – महाराष्ट्र” या राज्यव्यापी उपक्रमाअंतर्गत हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यांचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकीत कंपन्या सहभागी होणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी बायोडाटा, शैक्षणिक अर्हतेच्या मूळ प्रमाणपत्रां सह मुलाखतीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, कॅम्प येथे वेळीच उपस्थित राहून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेंगुर्ला यांच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेंगुर्ला , कॅम्प , महिला काथ्या कारखान्या नजीक वेंगुर्ला यांच्याशी संपर्क साधावा.












