सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोडामार्गच्या अध्यक्षपदी सुधीर चांदेलकर, तर नवरात्रौत्सव अध्यक्षपदी आनंद कामत यांची निवड

 

दोडामार्ग (प्रतिनिधी):

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोडामार्गच्या अध्यक्षपदी सुधीर चंद्रकांत चांदेलकर यांची, तर नवरात्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी आनंद निळकंठ कामत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव मंडळाची वार्षिक बैठक काल शनिवारी सायंकाळी पिंपळेश्वर सभागृहात पार पडली, ज्यामध्ये या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

दर तीन वर्षांनी कार्यकारिणी आणि पदाधिकारी बदलण्याच्या मंडळाच्या परंपरेनुसार या सर्व निवडी सर्वानुमते पार पडल्या.

गणेशोत्सव मंडळाची नवीन कार्यकारिणी:

अध्यक्ष: सुधीर चंद्रकांत चांदेलकर

उपाध्यक्ष: विशांत सूर्यकांत परमेकर

सचिव: आनंद निळकंठ कामत

खजिनदार: उदय यशवंत मयेकर (फेरनिवड)

नवरात्रौत्सव २०२६ ची नवीन कार्यकारिणी:

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रौत्सव २०२६ च्या आयोजनासाठीही नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.

अध्यक्ष: आनंद निळकंठ कामत

उपाध्यक्ष: सागर लक्ष्मण चांदेलकर

सचिव: रजत दिलीपकुमार राणे

या बैठकीला मंडळाचे माजी अध्यक्ष अजित चांदेलकर, प्रशांत केरकर, नितीन मणेरीकर, प्रवीण आरोंदेकर, रजत राणे, विशाल मणेरीकर, सुधीर चांदेलकर, विशांत परमेकर, प्रकाश सावंत, श्याम चांदेलकर यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.