संगमेश्वर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत ‘आठल्ये-सप्रे पित्रे’च्या मुलांच्या संघाला विजेतेपद, तर मुली उपविजेत्या

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे(१९वर्षाखालील गटात)देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने विजेतेपद, तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. या स्पर्धेमध्ये मुलांच्या संघाने पहिल्या सामन्यात भाईशा घोसाळकर कनिष्ठ महाविद्यालय, कडवईचा, तर दुसऱ्या सामन्यात पैसाफंड कनिष्ठ महाविद्यालय, संगमेश्वरचा सहज पराभव केला. अंतिम सामन्यात महाविद्यालयाच्या संघाने दादासाहेब सरफरे कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबी संघावर मात करत विजेतेपदाचा सन्मान प्राप्त केला. या शानदार कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाविद्यालयाच्या विजयी संघामध्ये रुतिक जाधव, देवदास पोवार, प्रणव गोमाणे, सुजल निवळकर, अनिकेत नवेले, उत्कर्ष रावणंग(कर्णधार), यश घवाळी, पार्थ गिड्ये(उपकर्णधार), प्रेम शिंदे, सुजल खानविलकर, केतन साळवी आणि सर्वेश भेरे यांचा समावेश आहे. स्पर्धेमध्ये मुलींचा संघ उपविजेता ठरला. यामध्ये अक्षरा कांबळे, ईश्वरी गुरव, जान्हवी चव्हाण, सिद्धी जाधव, मृणाली कांगणे, श्रुती किंजळे(कर्णधार), सानिका सनगले, शामल पातेरे(उपकर्णधार), वैदेही कान्हेरे, रिद्धी सुवरे, भक्ती शिवगण, भूमी कोटकर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या मुलांच्या संघातील उत्कर्ष रावणंग व सर्वेश भेरे यांनी तर, मुलींच्या संघातील शामल पातेरे यांनी चमकदार खेळ केला.

महाविद्यालयाच्या दोन्ही संघांना क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही संघासाठी व्यवस्थापिका म्हणून प्रा. देवयानी जोशी यांनी जबाबदारी सांभाळली. दोन्ही संघाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. विजय मुंडेकर, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनव पातेरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.