पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवगड जामसंडे भाजपा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर

भाजपा देवगड जामसंडे शहराच्यावतीने नुकसानग्रस्त भातपिकाची जामसंडे वळकुवाडी,पाटकरवाडी, जामसंडे टापू,भटवाडी येथील शेतकरी श्रीआनंद धोंडू तांबे,रमेश गणपत पाटकर,दयानंद शिवराम पाटकर,शांताराम पांडुरंग पाटकर नरेंद्रअनंत गोळम यांची प्रातिनिधीक स्वरुपात पाहणी केली यावेळी जेष्ठ नेते बाळ खडपे,मंडल अध्यक्ष राजा भुजबळ,शहराध्यक्ष वैभव करंगुटकर,गटनेते शरद ठुकरुल, शक्तीकेंद्र प्रमुख राजेंद्र वालकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील स्विकृत नगरसेवक चंद्रकांत कावले,माजी नगरसेवक बापू जुवाटकर,योगेश पाटकर, विजय वाळके,कृषि सहाय्यक श्री गोते आदींच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश प्राप्त झाले असून देवगड जामसंडे शहरातील सर्व प्रभागातील शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करण्यासाठी कृषि अधिकाऱ्यांसमवेत भाजपाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी दिली तसेच महाराष्ट्र शासन सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संकटकाळात घाबरून जाऊ नये व भविष्यात पाणी जपून वापरावे तसेच त्याचे नियोजन उत्तम रित्या करावे आणि काही गरज भासल्यास आमच्या स्थानिक नगरसेवकांशी,पदाधिकाऱ्यांशी किंवा पालकमंत्री संपर्क कार्यालय देवगड आणि भाजपा कार्यालय जामसंडे वडांबा येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे