चिपळूण (प्रतिनिधी) : बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कार्यरत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंच व अपारांत हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल हायस्कूल हर्णे, दापोली येथे रविवार दि. ०४ ऑक्टोबर \रोजी सकाळी ९.३० वाजता मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात अपारांत हॉस्पिटल चिपळूणचे तज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. या मोफत शिबिरात प्रसिद्ध ऑर्थोपेडिक डॉ. अब्बास जबले, फिजिशयन डॉ. रहिमत जबले, जनरल सर्जन डॉ. सदगुरु पाटणकर, ऑर्थोपेडिक डॉ. सुरेश भास्करवार, फिजिशयन डॉ. अतुल बोरोडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. पूजा भुरण हे आपली मोफत सेवा देणार आहेत. तसेच या शिबिरात डोळ्यांचे तज्ञ डॉक्टरांकडून मोफत डोळे तपासण्यात येणार आहेत. तरी या मोफत शिबिराचा हर्णे पंचक्रोशीतील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. या शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचारमंच चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री मुजफ्फर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून शिबिरास मंचचे उपाध्यक्ष शिवश्री दिनेश जी. माटे, कोकण प्रदेश अध्यक्ष तुळशीराम पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नईम शेख, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी प्रमुख रिजवाना शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात नाव नोंदणी व अधिक माहितीकरिता उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मेहमूद पावसकर (९०७६६१९१५५), अब्दुल मजीद मणियार (७७०९४९१०८३८), अब्दुल रऊफ पावसकर (८८३३८५५६४३८) यांच्याकडे संपर्क साधावा.












