कोकण सिरत कमिटीतर्फे जिल्हास्तरीय नाअत गायन व तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोकण सिरत कमिटी, चिपळूण यांच्या वतीने जिल्हास्तरीय ग्रुप नाअत गायन स्पर्धा तसेच तालुकास्तरीय इस्लामियात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी करण्यात आले. गोवळकोट येथील खदीजा स्कूलच्या हाजी मोहम्मद शमसुद्दीन असेंबली हॉलमध्ये दुपारी २ वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्वान मौलाना वासिफ काजमी होते. प्रमुख पाहुणे म्हणून इक्रा स्कूल, रत्नागिरीचे डायरेक्टर मौलाना इलियास बगदादी तसेच सलामा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक हाफिज सलीम परकार उपस्थित होते. यावेळी स्टॅण्डर्ड ह्युमन रिसोर्सेस कन्सल्टंटचे जनाब मकबूल साबळे तसेच कोशिश फाउंडेशन, चिपळूणचे सचिव जनाब फैयाज सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन जफर कटमाले, खदीजा स्कूलचे मुख्याध्यापक इरफान शेख, अजवा स्वीट्सचे मालक जावेद, पूर्ण सत्य चॅनलचे संपादक जमालुद्दीन बदरकर, अशफाक कुपे, पडवे ग्रामपंचायत सदस्य जैद भाटकर, इक्रा स्कूलचे मुख्याध्यापक जैनुलआबिदीन, नूरानी सर, कलीम सर, शजाउद्दीन सर, परीक्षक अ. कादिर तांबे, जियाउल्ला खान, मोईन सय्यद, इक्बाल दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मौलाना अ-रहमान चौगले यांच्या कुरआण पठणाने झाली. त्यानंतर इरफान शेख सर यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले.
सर्वप्रथम इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय इस्लामियात प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरीय ग्रुप नाअत गायन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधून एकूण २५ शाळांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सुमय्या मेयर यांनी आपल्या विशेष शैलीत केले. संस्थेचे सचिव मुजाहिद मेयर यांनी उपस्थित मान्यवर तसेच परीक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. परीक्षकांच्या वतीने मोईन सय्यद, तर मान्यवरांच्या वतीने मौलाना इलियास बगदादी आणि फैयाज सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्था अध्यक्ष सज्जाद काद्री यांनी प्रास्ताविक केले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल तालुकास्तरीय इस्लामियात प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक हाजी दाऊद अमीन हायस्कूल, कालुस्ते येथील अलि शुजाउद्दीन परकार व मर्यम अन्वर शेख यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक : एच. एम. परकार स्कूल, गोवळकोट रोड येथील लायबा मोहसिन बागवान व उस्मान जुनेद मेमन तृतीय क्रमांक : जि. प. प्राथमिक शाळा चिवेली उर्दू येथील आयशा जहीर चौगुले व आमिना एजाज परकार चतुर्थ क्रमांक : महाराष्ट्र हायस्कूल, चिपळूण येथील रिहान रिजवान अरकोट व हम्जा सिराज खान पाचवा क्रमांक : वांगडे प्राथमिक शाळा/स्कूल, चिपळूण येथील अ. रहमान मुजम्मिल टेमकर व उजेर हिदायत बालाभाई जिल्हास्तरीय ग्रुप नाअत गायन स्पर्धेचा निकाल जिल्हास्तरीय ग्रुप नाअत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल, गोवळकोट यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक : अल अमीन हायस्कूल, पोफळी तृतीय क्रमांक : अली पब्लिक स्कूल, चिपळूण चतुर्थ क्रमांक : जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, पोफळी उर्दू पाचवा क्रमांक : महाराष्ट्र हायस्कूल, कडवई (संगमेश्वर) कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण सिरत कमिटीच्या सदस्यांसह खुरशिद शाह, शेख हुसेन म्हातारनाईक, शाहनवाज शाह, रऊफ गोठे, नदीम तसेच लेडिज विभागाच्या डॉ. जुवेरिया गोठे, सौ. निलोफर सुर्वे आणि हुजैफा मेयर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक ज्ञान, वक्तृत्व, सांस्कृतिक जाणीव आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.