पंडोल आर्ट गॅलरी म. फि. हुसेनच्या चित्रांचे प्रदर्शन भरवत असेल तर त्याला विरोध करणारच- आ. निलेश राणे

चिपळूण (प्रतिनिधी) : भारत माता आणि हिंदू देवतांची नग्न चित्रे काढणाऱ्या मकबूल फिदा हुसेनच्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री जर पंडोल आर्ट गॅलरी करणार असेल तर त्याला आपण विरोध करणारच, असे परखड प्रतिक्रीया शिवसेनेचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.

हिंदू द्रोही चित्रकार म. फि. हुसेनच्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री मुंबई येथे पंडोल आर्ट गॅलरी च्या वतीने १२ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. या विरोधात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले आहे. कलात्मक स्वतंत्रते नावाखाली हिंदूंच्या श्रद्धास्थानांची आणि भारत मातेचा अवमानना करून राष्ट्र भक्तांचा राष्ट्र भावनेचा अपमान करणाऱ्या म. फि. हुसेन सारख्याचे स्तोम माजू देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे.

याच म. फि. हुसेनच्या विरोधात देशभरात पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या व हिंदूंच्या या प्रखर विरोधाचा धसका घेऊन भारत देश सोडून पळून गेला. आज निवेदन देण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे सुरेश शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवा सेनेचे निहार कोवळे, आदित्य जोशी, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक अमित जोशी, चिपळूण व्यापारी महा संघटनेचे सचिव उदय ओतारी, भाजपचे परीमल भोसले, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजिंक्य ओतारी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.