वेंगुर्ले : प्रतिनिधी
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार दुष्काळ सदृश्य परिस्थितीत भूजलस्तर वाढवण्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील आडेली गावात भाजप युवा मोर्चा तर्फे बंधारा घालून पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश देण्यात आला.
यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रणव वायंगणकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष/नगरसेवक प्रीतम सावंत, युवा मोर्चा उपाध्यक्ष दशरथ गडेकर, कौस्तुभ वायंगणकर, संतोष सोनसुरकर, बाळा सोनसुरकर, सूर्यकांत सोनसुरकर, गुरुराज राणे, हर्ष कोचरेकर, अर्जुन चव्हाण, तिरुपती राठोड,मुकुंद सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.












