पालकमंत्री नितेश राणे यांची फोंडाघाट अखंड हरिनाम सप्ताह निमित्त राधाकृष्ण मंदिराला भेट !

दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्याची सर्वांना ताकद दे — पालकमंत्री राणे यांचे राधाकृष्णाला साकडे !

फोंडाघाट भाजीपाला मित्र मंडळाच्या अघोरी नृत्य देखाव्याचा आनंद घेतला.

फोंडाघाट : श्रीदेव राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह ला पालकमंत्री नितेश राणे यांनी रात्री उशिरा भेट दिली. यावेळी त्यांनी, सर्वांना येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्याची सर्वांना ताकद दे ! अशी प्रार्थना केली आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत जि. प .सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, प.स.सदस्य पवन भालेकर,फोंडाघाटचे स्थानिक पुढारी व कार्यकर्ते, हेमंत फोंडेकर आणि अन्य उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचे वैश्य समाज मंडळातर्फे, सदस्य दिलीप पारकर व गणपत पारकर यांनी श्रीफळ,पुष्प, शाल देऊन स्वागत व सत्कार केला. त्यानंतर त्यांनी मंदिरा बाहेर फोंडाघाट भाजीपाला मित्र मंडळ आयोजित अघोरी नृत्य देखाव्याचा आनंद घेतला…