रत्नागिरी : केन्द्रीय विद्यालय, नाचणे (रत्नागिरी) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ते ५ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी भव्य ‘प्रवेशोत्सव २०२६-२७’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लोकमान्य टिळक नगर परिषद शाळा क्र. २ येथे पार पडणार आहे.
या विशेष सोहळ्यास महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच राज्यमंत्री योगेश कदम आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्र यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
याशिवाय कार्यक्रमाला लोकसभा सदस्य सुनील तटकरे, नारायण राणे; विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार; तसेच विधानसभा सदस्य शेखर निकम, भास्कर जाधव आणि किरण सामंत उपस्थित राहणार आहेत.
नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, आणि केन्द्रीय विद्यालय संघटन चे उपायुक्त विनोद कुमार बेहेरा यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाच्या सुरुवातीला त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पालक, नागरिक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केन्द्रीय विद्यालय, नाचणेचे प्राचार्य, शिक्षकवृंद, समस्त विद्यार्थी आणि विद्यालय प्रबंधन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
Home महत्वाच्या बातम्या केन्द्रीय विद्यालय, नाचणे येथे उद्या ‘प्रवेशोत्सव २०२६-२७’ सोहळा; उद्योगमंत्री डाॕ उदय सामंत...













