लांजा (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या शालेय मैदानी स्पर्धेत (१४ वर्षे वयोगट) जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ने वैयक्तिक व सांघिक ७ बक्षिसे पटकावून तालुक्यात अव्वल स्थान पटकावले.
१४ वर्षे वयोगट असलेल्या स्पर्धेत तळवडे विद्यालयाच्या ४×१०० रिले मुली प्रथम.आराध्या माने,आर्या टोळे, कल्याणी कांबळे,शितल गुरव, पौर्णिमा दरडे. 4×100 रिले मुलगे प्रथम
आदित्य माटल, चिराग पाटोळे, संभव दरडे, आयुष इंगळे, उमेश इंगळे. मीटर धावणे प्रथम आराध्या गुरुदास माने, ४९० मीटर धावणे प्रथम आदित्य अजय माटल ,४०० मीटर धावणे प्रथम आराध्या गुरुदास माने, ४०० मीटर धावणे द्वितीय आदित्य अजय माटल, ८० मी.हर्डल्स तृतीय संभव संजय दरडे
सदर विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे व प्रशिक्षक विजय पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या या यशाबद्दल तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई अध्यक्ष डॉ.आनंद जगन्नाथ पेडणेकर व तसेच मुंबई कमिटी उपाध्यक्ष अॅड.आर.बी.कदम, प्रमुख कार्यवाह मनोहर पाटोळे स्थानिक कमिटी अध्यक्ष दिगंबर पाटोळे, उपाध्यक्ष संजय पाटोळे,कार्यवाह मनोहर पाटोळे शाळा समिती चेअरमन कॅ.नामदेवराव पाटोळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंत लांजेकर तसेच मुख्याध्यापक श्री.प्रकाश हर्चेकर , ग्रामस्थ,पालक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी,यांनी अभिनंदन केले.












