चक्रीवादळाचा फटका ; फोंडाघाट लोरे रस्ता चौकातील वडाचे झाड लगतच्या दवाखाना,औषध दुकानावर कोसळले.!

जीवितहानी नाही. मात्र लाखोंचे नुकसान

निखिल कन्स्ट्रक्शनची तत्परता झाड तातडीने बाजूला केले

प्रशासन- तलाठी तातडीने घटनास्थळी !

फोंडाघाट : काल प्रमाणे आज सुद्धा चारचे दरम्यान फोंडाघाट मध्ये कोसळणाऱ्या धुवांधार पावसामुळे आणि चक्रीवादळामुळे हवेलीनगर येथील प्रथमेश कल्याणकर यांच्या गाळ्यात असलेल्या दवाखाना,औषध दुकानावर व गुरुकृपा हॉटेल वर रस्त्यालगतचे भले मोठे वडाचे झाड कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले. जीवित हानी झाली नाही. मात्र झाडाखाली उभे असलेल्या सुमारे आठ ते दहा दुचाकी शेजारी लोकांनी तातडीने बाजूला केल्याने त्यांचे नुकसान टळले..


चक्रीवादळ आणि सोसायटीचा वारा एवढा तीव्र होता की, वडाचे झाड रस्त्याच्या ऐवजी शेजारील गुरुकृपा हॉटेल, शुभांगी मेडिकल, डॉक्टर पाताडे यांचा दवाखाना प्रथमेश कल्याणकर यांचे गाळे यांच्यावर कोसळले. घटनेचे गांभीर्य राखून तलाठी समृद्धी गवस, सहाय्यक शितल पारकर, आणि कोतवाल पांडुरंगराणे यांनी तातडीने येऊन अपघाताची पाहणी केली. प्रथमदर्शनी कल्याणकर यांनी सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले.फोंडाघाट ग्राम विकास अधिकारी मंगेश राणे यांनीही त्यांच्याशी संपर्क साधून सहकार्य केले.


कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांनी निखिल कन्स्ट्रक्शन चे प्रसाद शेळके यांचे शी संपर्क साधून झाड हटविण्यासाठी माणसांची व जेसीबी सोय केली. या चक्रीवादळात जीर्ण झालेल्या वीज मंडळाच्या अनेक मेन वायर्स, तुटल्याने खंडित झाल्या.यावर कर्मचारी काम करीत आहेत.त्यामुळे चालू असलेल्या महोत्सवावर विरजण पडल्याचे चिन्ह आहे….