मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवमध्ये गोगटेच्या तन्वी सावंत देसाईला गोल्ड मेडल

रत्नागिरी :
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवमध्ये गोगटेच्या तन्वी सावंत देसाई हिला एकपात्री अभिनय स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले.
५९ व्या आंतर महाविद्यालय सांस्कृतिक युवा महोत्सव साठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अंतिम फेरीमध्ये
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये तन्वी सावंत देसाई हिने गोल्ड मेडल पटकावले आहे .
गोगटे जोगळेकर कर काॅलेज मध्ये तब्बल ८ वर्षांनी थिएटर विभागात गोल्ड मेडल मिळाले आहे.
तन्वीचे मार्गदर्शक- प्रा.आर्या वंडकर , प्रा.ओंकार रसाळ, डॉ. आनंद आंबेकर असून सखाराम बाईंडर, चारचौघी, शांतता कोर्ट चालू आहे या नाटकातील महत्त्वाच्या पात्रांच्या भूमिका साकारून अभिनय करुन audition देत आहे.

Industry मध्ये सध्या Followers च्या base वर cast करण्याच्या प्रकारावर हे पात्र भाष्य करत आहे. अभिनय तिच्यासाठी केवळ प्रसिद्धी किंवा फॉलोअर्स मिळवण्याचं माध्यम नसून तिचं जगणं आहे. डिजिटल युगात कलाकार आणि रसिक यांच्यातील बदललेलं नातं ती मांडते. जुन्या रंगकर्मींच्या परंपरेची आठवण करताना ती सांगते की, तिला फॉलोअर्सपेक्षा खरा रसिक आणि त्याच्या डोळ्यात उमटणारी भावना अधिक महत्त्वाची वाटते.

शेवटी ती स्वतःचा स्वाभिमान जपत ऑडिशन्स देत राहण्याचा निर्धार करते. पडदा पडला तरी एखाद्या प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आलं, चेहऱ्यावर हसू उमटलं किंवा त्याला स्वतःचं आयुष्य तिच्या अभिनयात दिसलं, तरच तिच्या अभिनयाचं खरं सार्थक झालं, असा भावपूर्ण संदेश या एकपात्रीतून मिळतो.
सदर यशस्वी विद्यार्थिनीचे कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर प्राचार्य डॉ मकरंद साखळकर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई ,कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये ,वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ.सीमा कदम ,विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे.