वेंगुर्ले भटवाडी येथे नगरसेवक प्रितम सावंत आणि सप्तरंगी भटवाडी मित्रमंडळाने बांधला बंधारा…

वेंगुर्ले : प्रतिनिधी

भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन पाणी अडविणे व पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने नगरसेवक प्रितम सावंत आणि सप्तरंगी भटवाडी मित्रमंडळ यांच्या वतीने भटवाडी येथे आज रविवारी बंधारा घालण्यात आला. नगरसेवक प्रितम सावंत यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ले शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये उभारण्यात येणारा हा दुसरा बंधारा आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ नर्मदा कॅश्यूचे मालक दिलीप सामंत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा भविष्यात उपयोग व्हावा आणि संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी नगरसेवक प्रितम सावंत यांच्यासह दिलीप सामंत, विनय सामंत, दिलीप मालवणकर, चारुदत्त नार्वेकर, कल्याण सावंत, नंदलाल नार्वेकर, प्रतीक मालवणकर, भूषण मालवणकर, सौरभ मालवणकर, अमोल मालवणकर, प्रशांत मालवणकर, पिंटू मालवणकर, विवेक राणे, मोहित आरोलकर, गौरेश सावंत, देवेश सावंत, रुपेश सावंत, नितीन सावंत, संकल्प सावळ, संग्राम सामंत, गौरेश आरोलकर आणि शुभम सावंत आदी उपस्थित होते. या उपक्रमात वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छता विभाग यांनी सहकार्य केले.