ओटवणे ( प्रतिनिधी )श्री देव रवळनाथ वाचनालय पुरस्कृत सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ओटवणे आयोजित नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणारआहेत .घटस्थापनेला देवीची मूर्ती स्थानापन्न झाल्यापासून भरघच्च कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी देवीचं आगमन झाल्यानंतर देवीची पुजा महाप्रसाद महाआरती रात्री स्वामी माऊली भजन मंडळाचे बुवा महेश नाईक यांचे सुश्राव्य भजन. सोमवारी १२ ऑक्टोबर रोजी १०. ३० वा देवीची पुजा १२. ३० आरती १ वा. महाप्रसाद ७. ०० महा आरती,८. ३० वाजता स्वामी माऊली दशावतार नाट्य मंडळ डोंगरपाल यांचा “आई म्हाळसादेवी चा महिमा” हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे 13 ऑक्टोंबर रोजी नित्यनेमाने देवीची पूजा आरती महाप्रसाद आणि रात्री ८. ३० वाजता ओटवणे दशक्रोषी मर्यादित वेशभूषा स्पर्धा.१४ ऑक्टोबर देवीची पूजा महाप्रसाद महाआरती गुरुवारी १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी देवीची पूजा आरती महाप्रसाद आणि रात्री महाआरती त्यानंतर बुवा दीपक खरुडे, बुवा संजय गावडे बुवा स्वप्निल म्हापसेकर यांचा तिरंगी डबलबारीचा सामना होणार आहे. 16 ऑक्टोबर सहाव्या दिवशी नित्य नीयमाप्रमाणे १०. ३० वाजता देवीची पूजा १२. ३० वाजता आरती १.०० वाजता महाप्रसाद सहा वाजता महाआरती सायंकाळी ७.०० वाजता हरिपाठ ८. ३० वा.जय गणेश दांडिया ग्रुप मळगाव ११ वा. खुली दांडिया. १७ ऑक्टोबर ७ व्या दिवशी पूजा आरती महाप्रसाद महाआरती आणि रात्री ८. ३० वाजता ह.भ.प. कीर्तनकार सुनील मयेकर, ह.भ. प. महिला कीर्तनकार सिद्धी मेस्त्री यांचे किर्तन पार पडणार आहे. रविवार १८ ऑक्टोबर ८ व्या दिवशी ८. ०० दुर्गामाता दौड,त्यानंतर देवीची पूजा आरती महाप्रसाद रात्री महाआरती त्यानंतर रात्रो ठीक ९ वा. सप्तरंग कला मंच होडावडे यांचा महान पौराणिक दोन अंकी संगीत ट्रिकसीनयुक्त नाटक “ब्रम्हांडनायक” हे पार पडणार आहे. नवव्या दिवशी १९ ऑक्टोबर रोजी देवीची पूजा आरती महाप्रसाद रात्री ९. ३० वा. कुळकर प्रसादिक भजन मंडळ ओटवणे यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे दहाव्या दिनी नित्यनेमाने पार पडणारे दिवसभरातील कार्यक्रम आणि रात्री विसर्जन तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रवळनाथ वाचनालय ओटवणे तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ ओटवणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.













