गोरिवलेवाडीतील अंतर्गत गटारांची आरोग्य सभापती शुभम पिसे यांच्याकडून पाहणी

ग्रामस्थांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या; लवकरच निवारण करण्याचे आश्वासन

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषदेचे आरोग्य सभापती शुभम पिसे यांनी गोरिवलेवाडी येथील अंतर्गत गटारांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. गौरी गोरिवले आणि ग्रामस्थांशी संवाद साधून गटारांसंदर्भातील समस्या व अडचणी जाणून घेतल्या. या पाहणीदरम्यान गटारांच्या स्थितीबाबत ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. संबंधित अडचणींची दखल घेत येत्या काही दिवसांत त्यांचे निवारण करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य सभापती शुभम पिसे यांनी दिले.
स्थानिक भागातील नागरी समस्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेण्याच्या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाली. पाहणीदरम्यान समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सुयोग चव्हाण, अमोल तटकरे, कार्यकर्ते, गोरिवलेवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. गौरी गोरिवले आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी आरोग्य सभापती शुभम पिसे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.