गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड.पी.आर नामजोशी कला,वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ,विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी फार्मासी क्षेत्रातील करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी खेड तालुक्यातील बोरज येथील ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मासी कॉलेज चे प्राचार्य. डॉ.सुजित नगरे उपस्थित होते.
डॉ.सुजित नगरे बी फार्मासी मधील करिअर आणि भविष्यातील संधी याविषयी मार्गदर्शन केले.फार्मासी केल्यावर नोकरी व स्वतःचा व्यवसाय कशा पद्धतीने उभा करू शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन केले.त्याचं प्रमाणे फार्मासी मधील शिक्षण घेताना विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनांकडून कोणत्या सेवा सवलती दिल्या जातात याविषयी देखील मार्गदर्शन केले.यावेळी त्यांचे सोबत शुभम घोसाळकर देखील उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गौरव पोंक्षे यांनी केले.













