ओटवणे (प्रतिनिधी )ओटवणे गावच्या अनेक चाली रिती परंपरेतील एक महत्वाची परंपरा म्हणजे नवं कापणी.यावर्षी विलंबाने का होईना उत्साहात ढोल ताशाच्या, ब्राह्मणांच्या मंत्रघोषात ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही नवं कापणी उत्साहात पार पडली. यावेळी देवस्थान प्रमुख मान कऱ्यांच्या वतीने देवाला साकडं घालत उत्साहात पार पाडण्यात आली.
एरव्ही ही नवं कापणी ऐन चतुर्थीत म्हणजे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. मात्र यावेळी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी उत्तरा नक्षत्र असल्याने या नक्षत्रात नवं कापणी करणे योग्य नसल्याने चांगल्या मुहूर्थावर करण्याचे ठरले आणि अखेर या नवकापणीला मुहूर्त मिळाला आणि नवं कापणी उत्साहात पार पडली. खरंतरगणेश चतुर्थीत गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी गावात होणारी नवं कापणी आणि त्यात सहभागी होणे ही पर्वणी असते मात्र चतुर्थीत हा सोहळा पार न पडल्याने चाकरमान्यांचा मात्र हिरमोड झाला. घटस्थापना झाल्यानंतर च्या शुभ मुहूर्थावर ही नवं कापणी पार पडली.नव्याची तोरणे बनवून देव देवाताना अर्पण करून, दरवाजावर सजवून ग्रामस्थानी ही परंपरा त्याच आनंदाने उत्साहात पार पाडली.













