गौरव पोंक्षे | माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे माखजन ग्रामपंचायत व माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी माखजन गावात कुंभारवाडी नजीक तीन बंधारे बांधले.
माखजन ग्रामपंचायतीचे सरपंच महेश बाष्टे यांनी स्वतः बंधारा बांधताना खूप मेहनत घेतली.यावेळी अजीज आलेकर देखील उपस्थित होते.
माखजन ग्रामपंचायत आणि नामजोशी कॉलेज चे विद्यार्थी यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे म्हणूनच नाही तर दर वर्षी भूजलं पातळी वाढण्यासाठी बंधारे बांधत असते.सध्या प्रत्येक गावात वनराई बंधारे बांधण्याचे प्रमाण वाढले आहे.यामुळे दुष्काळी काळात देखील भूजलं पातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे.माखजन येथील हे बंधारे बांधताना जिल्हा परिषदेची माखजन मराठी शाळेतील विद्यार्थी देखील उपस्थित होते.
यावेळी नामजोशी कॉलेज चे प्रा अभिजित सुर्वे,नोडल अधिकारी प्रदीप पाटील सहाय्यक नोडलं अधिकारी सुनील लोंढे,केंद्र, माखजन प्रमुख दत्ताराम गोताड,कासे केंद्र प्रमुख बी व्ही जानकर,माखजन हायस्कुल चे मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,प्रा गौरव पोंक्षे,माखजन मराठी च्या मुख्याध्यापिका सौ कल्पना नांदिवडेकर,स्नेहा पवार,सतीश साठे आदी उपस्थित होते. प्रत्येक वर्षी हे बंधारे बांधले जात असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व माखजन सरपंच महेश बाष्टे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.













