खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश
केंद्रीय मार्ग निधी २०२४-२५ अंतर्गत निधी मंजूर
राजापूर (प्रतिनिधी): गेली कित्येक वर्षे मागणी असलेल्या राजापूर तालुक्यातील गोवळ आणि विल्ये या गावांदरम्यान अर्जुना नदीवर मोठ्या पुलाचे कामासाठी केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी यासाठी केलेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याला यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पुलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने या परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेली कित्येक वर्षे अर्जुना नदीवर गोवळ आणि विल्ये या गावांना जोडणारा मोठा पूल उभारण्याची मागणी होती. यासाठी स्थानिकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या कामासाठी शासनाकडून केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये पुलाच्या बांधकामासह संबंधित जोडरस्ते आणि आवश्यक पूरक कामांचाही समावेश आहे.
राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी नदीवरील पूल महत्त्वाची भूमिका बजावतात. गोवळ-विल्ये दरम्यानचा हा पूल पूर्ण झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच स्थानिक वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांनाही याचा लाभ होणार आहे.
या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाल्याने पुलाच्या बांधकामाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आता प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया, निविदा आणि इतर प्रशासकीय बाबी पूर्ण होऊन प्रत्यक्षात हे काम सुरू होणार आहे.
गेली कित्येक वर्षे मागणी असलेल्या या पुलाचा प्रश्न खा. राणे यांनी मार्गी लावल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी खा. राणे यांचे आभार मानले आहेत.
Home महत्वाच्या बातम्या राजापुरातील गोवळ आणि विल्ये गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीवरील पुलासाठी २५ कोटींचा निधी...













