अभिजित दिपके हा उमर खालिद अफजल गुरू समर्थक आणि दिपके समर्थक असलेले उद्धव ठाकरे अफजल गुरू समर्थक
शिवाजी पार्कवर गोमूत्र शिंपडावे
रिजिम चेंजची भाषा आतंकवादी आणि शरिया समर्थकांची
ओरोस :शिवाजी पार्कवर शरिया समर्थकांचा उबाठा चा मेळावा झाला. रिजिम चेंज ची भाषा उमर खालिद समर्थक आणि ज्यांना भारतात अराजकता हवी आहे ते करतात. अभिजित दीपके हा उमर खालिद चा समर्थक आहे. उमर खालिद हा अफजल गुरूचा समर्थक असल्याने अभिजित दिपके चे छातीठोकपणे समर्थन करणारे उद्धव ठाकरे अफजल गुरू चे समर्थक आहेत.रिजिम चेंज ची भाषा करणाऱ्यांचे तळवे काल शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंनी केले. ज्या बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है म्हटले त्यांच्याच मुलाला काल हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात बोलताना शिवाजी पार्कवर पाहिले. शिवाजी पार्कवर गोमूत्र शिंपडावे अशा शब्दांत भाजपा हिंदुत्ववादी नेते मंत्री नितेश राणे यांनी उबाठा च्या दसरा मेळाव्याचा खरपूस समाचार पत्रकार परिषदेत घेतला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जि प उपाध्यक्ष दादा साईल, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते. पुढे बोलताना मंत्री राणे म्हणाले की, राहुल गांधी ने एक्स हॅंडल वर आर एस एस विरोधात केलेल्या स्टेटमेंट विरोधात बोलायची हिंमत दाखवा. राहुल गांधींच्या खांद्यावर बसून उद्धव रिजिम चेंज करणार असे स्वतः संजय राऊत म्हणतायत. अमित शहा ना बिष्णोई म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी सध्या दाऊद इब्राहिम च्या भूमिकेत उद्धव ठाकरे आहे त्याबद्दल थोबाड उघडावे. कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल उद्धव ने तोंड उघडू नये. स्वतः उद्धव आणि त्याचा मुलगा आदित्य चे नाव दिशा सालियान च्या रेप आणि मर्डर केसमध्ये आले आहे.त्यामुळे उध्दवने कायदा सुव्यवस्था याबद्दल बोलू नये. सुशांतसिंग रजपूतला तुझ्या मालकाच्या मुलाच्या नाईट लाईफ गॅंग ने ढगात पोचवले. फडणवीस सरकार मध्ये गुंडाचे लाड केले जात नाहीत.टायगर श्रॉफ वर हल्ला झाल्यावर लागलीच आंतरराज्य संवाद साधून तातडीने राजस्थान मधून हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. एप्रिल मध्ये मोदी सरकार पडण्याचे भाकीत संजय राऊत ने केले आहे. मोदी साहेब प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहेत. त्यामुळे मोदी सरकार पडण्याचे स्वप्न बघू नका. मोदी सरकार पडण्याचे राहूदे पण तुझ्या मालकाचा मुलगा येत्या जानेवारी 2027 आधी जेलमध्ये जाईल.त्यामुळे आदित्य हॅप्पी न्यू इअर आर्थर रोड जेलमध्ये साजरे करेल की स्वतःच्या घरात करेल याची काळजी संजय राऊत ने करावी असा प्रहार ही मंत्री नितेश राणे यांनी केला.













