मंडणगड, (प्रतिनिधी): आजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे नागरिकांना अनेक आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागतो आहे. शरीरात एखादा गंभीर आजार बळावल्याचे लक्षात आल्यावर सर्वसामान्य नागरिक हादरून जातात; परंतु अशा बिकट प्रसंगी उपचारांसाठी पैशांची कमतरता भासल्यास सर्वसामान्य कुटुंबांसमोर मोठे संकट उभे ठाकते. या पार्श्वभूमीवर, मंडणगड तालुक्यातील नारगोली गावात ‘रियांश अमृत ज्यूस’च्या माध्यमातून आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आर्थिक संकटांपासून वाचण्यासाठी एक प्रभावी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कार्यक्रमात विजय पवार आणि कैलास शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, आजच्या काळात आरोग्याप्रती जागरूक राहणे किती गरजेचे आहे, यावर प्रकाश टाकला. रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे किशोर तटकरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या मार्गदर्शनामुळे सर्वांना रियांश अमृत ज्युस चे महत्त्व व आजच्या गुंतागुंतीच्या काळात डॉक्टरांनी आयुष्य भर घेण्यात सुचविलेल्या औषध उपचार उदाहरणार्थ कॅप्सूल गोळ्या हानिकारक आहेत याचेही महत्व सांगण्यात आले.
सध्याच्या युगात अनेक असाध्य आजारांवर मात करण्यासाठी ‘रियांश अमृत ज्यूस’ हा एक रामबाण उपाय म्हणून समोर येत असून, या माध्यमातून आरोग्याची उत्तम काळजी घेता येऊ शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व प्रसारासाठी सतीश पाष्टे आणि चंद्रकांत नागले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे नारगोली ग्रामस्थ व महिला मंडळ बालगोपाल परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी नवी जनजागृती निर्माण झाली असून, अनेकांनी या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.













