बर्वे ग्रंथालयात दिवाळी आकाशकंदील स्पर्धेचे आयोजन

देवगड : प्रतिनिधी

 

उमाबाई बर्वे ग्रंथालय, देवगड यांच्यावतीने दिवाळीनिमित्त आकाशकंदील स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय गट (इयत्ता दहावीपर्यंत) आणि खुला गट अशा दोन गटांत होणार आहे.

 

स्पर्धकांनी आकाशकंदील तयार करताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे. थर्माकोल, प्लास्टिक आदी साहित्याचा वापर करण्यास मनाई आहे. हे नियम दोन्ही गटांसाठी लागू राहतील. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

 

दोन्ही गटांतील स्पर्धकांनी आपले आकाशकंदील ६ नोव्हेंबरपर्यंत ग्रंथालयात जमा करावेत. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या सभागृहात सर्व आकाशकंदिलांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, याच वेळी पारितोषिक व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेत इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर यांनी केले आहे.