रत्नागिरी :
महाराष्ट्र एन. सी. सी. डिरेक्टरेट च्या कोंकण ज्ञानतरंग मोहिमेच्या दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात झाला. सकाळी ०७:०० वाजता वरावडे गावातील तिवरी बंदर येथून वरावडे गावचे सरपंच श्री. गजानन हेडाऊकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बोट जयगड बंदरासाठी रवाना करण्यात आली.
या कॅम्पदरम्यान अभियानातील पथनाट्य पथकाने स्थानिक नागरिकांमध्ये विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी प्रभावी पथनाट्ये सादर केली:
पहिले सादरीकरण: वरावडे गावातील श्री राधाकृष्ण मंदिर परिसर मध्ये ग्रामस्त आणि लहान मुलांनी उपास्थित राहून छान प्रतिसाद दिला
दुसरे सादरीकरण: मालगुंड येथील बळीराम पारकर विद्यालया या 627 मुलांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रतिसाद दिला
तिसरे सादरीकरण: जयगड येथील मुख्य परिसरात.
विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या सर्व पथनाट्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला













