▪️सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त स्वरचित काव्यवाचन स्पर्धेस प्रतिसाद
मसुरे | झुंजार पेडणेकर
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे
सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ द्वारा अनुदानीत हे संमेलन २८ व २९ नोव्हेंबर रोजी मालवण येथे संपन्न होणार आहे.
त्यानिमित्ताने लघु कथा लेखन , अभिवाचन, रील, बॅ ना थ पै
जीवनदर्शन महिलांसाठी उखाणे, शब्दकोडे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला.
इयत्ता ८ वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी
स्वरचित काव्यवाचन स्पर्धा संपन्न झाली. मुलानी पेपरफुटी, पुस्तके, सुंदर कोकण, स्त्री, दुष्काळ, मोबाईल
आदी विविध विषयावर कविता सादर केल्या.
यावेळी वराडकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भास्कर आकेरकर यानी मुलाना मार्गदर्शन केले. चांगली कविता सुचण्यासाठी मुलानी भरपूर वाचन करणे आवश्यक आहे. विविध विषयावरील पुस्तके वाचल्याने प्रगत्भता येते. त्यातून सुंदर कविता निर्मिती होवू शकते. मुलानी विविध विषयावरील कविता सादर केल्याबद्दल त्यानी समाधान व्यक्त केले.
दीपक भोगटे यानीही मुलाना मार्गदर्शन केले.
बॅ नाथ पै सेवांगणात गेली अनेक वर्ष यानिमित विविध उपक्रम राबवले जातात. मुलानी विविध विषयावर
छान कविता सादर केल्याबद्दल सर्व मुलांचे कौतुक केले.
या स्पर्धेतील गुणवंत मुलांचा मालवण येथील साहित्य संमेलनात
साहित्यिकांचे हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
सर्व सहभागी मुलाना नरेंद्र दाभोळकर
यानी लिहिलेली पुस्तके भेट देण्यात आली.
या कवितांचे परीक्षण किशोर शिरोडकर व शोभा म्हाडगुत यानी केले.
या कार्यक्रमास भास्कर आकेरकर,किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, शोभा म्हाडगुत, दीपक भोगटे, विद्या चिंदरकर, साक्षी अमरे, मनोज काळसेकर, मंगल पराडकर, बाळकृष्ण गोंधळी व विद्यार्थी उपस्थित होते.













