समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपतर्फे क्रीडाक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा, पत्रकार दीपक शिंदे, डॉ.साक्षी शिंदे यांचा सत्कार

चिपळूण (प्रतिनिधी) : क्रीडाक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा, पत्रकार दीपक शिंदे, डॉ.साक्षी शिंदे यांचा त्रिवेणी भव्य गौरव समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपतर्फे करण्यात आला. क्रीडाक्षेत्रात ५३ व्या कुमार, कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्याच्या संघात निवड झाल्याबद्दल, आपल्या उत्कृष्ट कामगिरीने आपल्या गावाचे नाव उंचावणाऱ्या स्थानिक गुणवंत खेळाडूंचा समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्या वतीने नुकताच भव्य सत्कार करण्यात आला.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाला दाद देण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या हस्ते सोहम कदम, सिद्धांत जाधव, प्रतीक शिंदे, सम्राट गमरे, चिन्मयी ढगळे, मुग्धा शिर्के, समीक्षा पवार, गौरी कांबळी, श्रीया हुंबरे,अनुराधा भिसे, नेत्रा शिंदे, सपना यादव व्यवस्थापक मुली त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार संपादक मराठी समाचार अभ्यासू पत्रकार नांदिवसे गावचे सुपुत्र दीपक शिंदे व नुकतीच डॉक्टर पदवी प्रदान केलेली कळकवणे गावची सुकन्या साक्षी शिंदे यांना भारताचे संविधान देण्यात आले व सर्वांचे औक्षण करून शाल,सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
ग्रामीण व स्थानिक पातळीवरील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, या उद्देशाने विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुप नेहमीच कटिबद्ध राहिला आहे. याप्रसंगी बोलताना विनेश भाऊ मोहिते म्हणाले की, “खेळाडू हे आपल्या गावाची नवी पिढी आहे. देशाचे भविष्य आणि आपल्या तालुक्याचे,जिल्ह्याची शान आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या खेळाडूंनी क्रीडाक्षेत्रात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. या खेळाडूंच्या पुढील वाटचालीत आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी आमचा समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुप नेहमीच पाठीशी उभा राहील.” खेळाडू आणि पत्रकार दीपक रमेश शिंदे व डॉ. साक्षी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आनंद व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना खेळाडूंनी समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपचे मनापासून आभार मानले. “अशा प्रकारच्या प्रोहोत्सनामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो आणि मैदानावर अधिक जोमाने कामगिरी करण्याची ऊर्जा मिळते,” अशी भावना सत्कारमूर्ती खेळाडूंनी व्यक्त केली. या सोहळ्याला परिसरातील क्रीडाप्रेमी, नागरिक वीरकुमार कदम माजी उपसरपंच कळकवणे, धनंजय शिंदे, झोलाई देवस्थान ट्रस्ट सचिव, मनोहर शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष, दौलत गजमल माजी खेळाडू, विकास जाधव माजी खेळाडू चिपळूण ता. कबड्डी असोसिएशन सदस्य, अरुण कदम माजी सरपंच कळकवणे, योगेश हुंबरे माजी राष्ट्रीय खेळाडू, श्रद्धा हुंबरे, राखी सकपाळ, सूरज पवार, संतोष शिंदे, मंगेश शिंदे, विशेष सहकार्य स्वप्नील बाबाजीराव शिंदे, महेश शिंदे (MD) विकास मोहिते, राहुल मोरे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य सामाजिक विकास ग्रूपचे माजी सैनिक संभाजी चव्हाण, सुनील खरात, प्रसाद वनगे, सुधीर मोरे, वैभव मोहिते ,विवेक जाधव, नितीन शिगवण, प्रास्ताविक मुख्य प्रवर्तक विनेश भाऊ मोहिते यांनी तर सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले.