औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाट येथे ‘इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन’च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

फोंडाघाट ; औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाट येथे ‘इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन’ व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थींसाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘नेक्स्ट जेनरेशन इन्फ्रा अकॅडमी’ चे श्री. गिरीश चिपळूणकर व श्रीमती गार्गी चिपळूणकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘ऑटो कॅड’ (AutoCAD) आणि ‘गुगल स्केचअप’ (Google SketchUp) या आधुनिक डिझायनिंग सॉफ्टवेअरचे सखोल मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवली.

 

 

संस्थेचे प्राचार्य बी. पी. सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्यात भर पडावी आणि त्यांना भविष्यात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सर्व प्रशिक्षणार्थींना AICPE (All India Council for Professional Education) अंतर्गत नोंदणी करून अल्पदरात कोर्सचे अधिकृत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला. इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन विभागाचे निदेशक एस.एस.मेस्त्री यांच्या कल्पक संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रबद्ध आणि सूत्रसंचालन निदेशक अभिषेक जोशी यांनी केले, तसेच कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी संस्थेचे निदेशक श्री भास्कर पाटील, सतीश मेस्त्री, स्वप्नील विश्वांभरे, गणेश मराठे, श्रीमती.सायली तळवडेकर, कनिष्ठ लिपिक एल. जी. असोलकर, भंडारपाल राहुल पाटील, imc क्लर्क एम.डी पराडकर यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी एस. एस. आचरेकर, रामचंद्र इस्वलकर आणि संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी/विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य आणि नवीन डिझायनिंग टूल्स शिकण्याबाबत मोठा उत्साह पाहावयास मिळाला.