शृंगारतळीत रस्त्यावरील मच्छी विक्रीकरणाऱ्या महिलांकडून ‘हप्ता’ वसुली

बेकायदेशीर हप्ता वसुलीची जोरदार चर्चा

गुहागर प्रतिनिधी : 
तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी मध्ये रस्त्यावर बसून मच्छी विक्री करणाऱ्या महिलांकडून प्रत्येक दिवस 100 रुपये दराने हफ्ते वसुली सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शृंगारतळी मध्ये एका ठिकाणी नव्हे तर तब्बल २ वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर बसून मच्छी विक्री करणाऱ्या महिलांकडून रोज बेकायदेशीरपणे 100 रुपये दराने हप्ता गोळा केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे दिवसाचा हफ्ता न दिल्यास मच्छीच्या टोपल्या लातेने उडवण्याचा प्रकार शृंगारातली बाजारात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान हा बेकायदेशीर हप्ता वसुलीचा प्रकार स्थानिक पातळीवर कोणाच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने सुरू ?? याचीच सध्या सर्वत्र चर्चा असून श्रृंगारतळीत अधिकृत मार्केट सोडून मध्यवर्ती ठिकाणी मच्छी विक्री करणाऱ्या महिलांकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतय का ?? असाही सवाल उपस्थित होत आहे.
मात्र बाजारामध्ये दादागिरी करून सुरू असलेल्या हफ्ता वसुलीवरती कोण कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.