कुडाळमध्ये भीषण अपघात! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; ३५ वर्षीय भूषण कुडाळकर यांचा मृत्यू

कुडाळ ; मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भूषण सुरेश कुडाळकर (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कुडाळ) यांचा मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचा पच्चात आई बायको दोन मुल असा परिवार आहे.