सावंतवाडीत १ नोव्हेंबरला न्यायमूर्ती अश्विन भोबे यांचे ‘जामिनाचा कायदा’ या विषयावर व्याख्यान

सावंतवाडी:सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने ‘Lex Discussion’ या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत गोवा राज्याचे पालक न्यायमूर्ती माननीय अश्विन दामोदर भोबे साहेब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ते ‘जामिनाचा कायदा’ (Law Of Bail) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालय प्रांगणात पार पडणार आहे. कायदेशीर क्षेत्रातील अत्यंत अभ्यासपूर्ण अशा या व्याख्यानाचा लाभ सर्व वकील मंडळी तसेच सर्व विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी बाबुराव रणशूर, सचिव ॲड. संकेत अभय नेवगी तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य काम पाहत आहेत.