आठवड्यातून एक पूर्ण दिवस तज्ज्ञ दंतवैद्य देणार सेवा; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
मंडणगड प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असून, मंडणगड ग्रामीण रुग्णालयात आता दंतचिकित्सा सेवा उपलब्ध होणार आहे. आठवड्यातून एक पूर्ण दिवस तज्ज्ञ दंतवैद्य कज्ञ डॉक्टर रुग्णालयात सेवा देणार असून, यासंदर्भातील अधिकृत नियुक्ती आदेश आज रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
दातांच्या विविध आजारांवरील उपचारांसाठी खासगी दवाखान्यांमध्ये नागरिकांना मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. आर्थिक परिस्थितीअभावी अनेक गरीब, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिक उपचार घेणे टाळतात. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयात दंतचिकित्सा सेवा सुरू व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. या मागणीला आता यश आले आहे.
नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत शिवसेना तालुका कार्यकारिणीच्या वतीने गृह राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. यामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिलजी रटाटे, सदस्या दीप्तीत घडशी, शहरप्रमुख, विनोद जाधव, शिवसेना सचिव तथा रुग्णकल्याण समिती सदस्य सिद्धेश देशपांडे, शिरगावचे उपसरपंच विश्वनाथ सावंत आणि भिंगळोलीचे उपसरपंच संदीप कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नामदार योगेश कदम यांनी राज्याचे आरोग्यमंत्री नामदार . प्रकाश आबिटकर यांच्याकडे मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दंतचिकित्सकाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून जिल्हा शल्यचिकित्सकांनी तज्ज्ञ दंतवैद्याच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आता स्थानिक पातळीवरच दातांच्या आजारांवर उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, मंडणगड ग्रामीण रुग्णालयात लवकरच डायलिसिसची सुविधाही सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले असून, तालुक्यातील नागरिकांनी या शासकीय दंतचिकित्सा सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना तालुका कार्यकारिणी तसेच ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या सुविधेसाठी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर आणि ना. योगेश कदम यांचे शिवसेना मंडणगड तालुका कार्यकारिणीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत













