परिसरात चिंतेचे वातावरण
गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन नजीक मावळंगे येथे चक्क पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात सध्या चिंतेचे वातावरण आहे.
मावळंगे येथील रहिवासी अभिजित बेलवलकर यांच्या घरा नजीक रात्री चे वेळी हा पट्टेरी वाघ त्यांना दिसला घरातील खिडकीतून त्यांनी त्याचा फोटो घेतला.मावळंगे परिसरात बिबटे राजरोस निदर्शनास येतात डरकाळी फोडल्याचे आवाज रात्री चे वेळी सहज ऐकू येतात.पण पट्टेरी वाघ दिसल्याने येथील नागरिकांची चिंता वाढली आहे.
माखजन परिसरात आंबव पोंक्षे,सरंद नागझरी, तुरळ, आरवली, पेढांबे,कासे, शिरंबे भागात गवा रेडे,कोल्हे,रानडुक्कर,माकड,बिबटे आदी प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे.त्यातच आता पट्टेरी वाघ दिसल्याने भीती वाढली आहे.
बिबटे ,पट्टेरी वाघाच्या तुलनेत थोडे माणसाची चाहूल लागली तर पळतात पण पट्टेरी वाघ तसे आक्रमक असल्याने मानवी वस्तीवर सहजतेने आक्रमण करू शकतात.यामुळे सध्या माखजन परिसरात ज्या ठिकाणी हे पट्टेरी वाघ दिसत आहेत त्या ठिकाणी वन विभागाने पिंजरे लावावे अशी मागणी होत आहे.













