देवबागमध्ये अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; २ लाख २० हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त!

गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ४६ बॉक्स हस्तगत; एकावर कारवाई

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली मालवण पोलिस पथकाची धडक कारवाई

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील देवबाग येथे अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ४६ बॉक्स जप्त केले. या दारूची एकूण किंमत २ लाख २० हजार ८०० रुपये असून, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली.

 

देवबाग परिसरात अवैध दारूविक्री होत असल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणात कॅलीस डॉमिनिक डिसोजा (रा. देवबाग, ता. मालवण) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूच्या ४६ बॉक्सची एकूण किंमत २ लाख २० हजार ८०० रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

 

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार आणि हेड कॉन्स्टेबल सोनाली पाटकर यांचा सहभाग होता.

 

अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.