रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे निबंध स्पर्धा

आचरा-अर्जुन बापर्डेकर

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा आयोजित , सौ. भावना मुणगेकर, मुंबई व श्रीम. मिथिला नेरुरकर पुणे प्रायोजित आचरा पंचक्रोशीतील *इयत्ता ७ वी ते ९ वी च्या* विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम क्रमांक – रु.३०१/-द्वितीय क्रमांक -रु.२५१/-

तृतीय क्रमांक – रु.२०१/-उत्तेजनार्थ प्रथम- रु.१०१/-

उत्तेजनार्थ द्वितीय- रु.१०१/- असून

पाणी हेच जीवन या विषयावर स्पर्धकांनी निबंध सादर करायचा आहे. यासाठी शब्दमर्यादा -५०० शब्द असून निबंध लिहिण्यासाठी कोणत्या पुस्तकांचा संदर्भ म्हणून वापर केलात त्या पुस्तकांची नावे निबंधासोबत जोडावी.स्पर्धक विद्यार्थ्याने निबंध पोस्टाने किंवा हस्ते परहस्ते न पाठवता स्वतः दि. ३० नोव्हेंबर २०२६ दुपारी ठीक १२ वाजेपर्यंत संस्थेत आणून द्यावा.अधिक माहितीसाठी संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत (सकाळी १० ते ४वाजेपर्यंत )संस्थेच्या ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांच्याशी फोन नंबर o२३६५-२४६०१७ वर संपर्क साधावा.असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.