मसुरे | झुंजार पेडणेकर
श्री समर्थ बागवे महाराज संस्थान, मसुरे देऊळवाडा यांच्या वतीने मसुरे देऊळवाडा दत्त मंदिरात ६ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘गुरुद्वादशी उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.०० ते ११.०० वा. दत्तगुरू पुजाविधी व अभिषेक,
दुपारी १२.०० वा. महाआरती,
दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद,
सायं. ७.०० ते ९.०० वा. स्थानिक भजने.
रात्री ठीक ९.३० वा.: दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचा महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी या उत्सवास उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थान, मसुरे देऊळवाडा स्थानिक व मुंबई कमिटीतर्फे करण्यात आले आहे.













