भट्टीवाडी येथील राजेश शिगवण यांचे अल्पशा आजारानिधन

मंडणगड प्रतिनिधी : तालुक्यातील भट्टीवाडी येथील रहिवासी राजेश सखाराम शिगवण वय ४० यांचे गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने पंदेरी भट्टीवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने भट्टीवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व नातेवाईक असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वाजता भट्टीवाडी येथील स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
कै. राजेश शिगवण यांच्या निधनाने शिगवण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, समस्त भट्टीवाडी ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.