रत्नागिरी:
दीपावली पर्वाचा पहिला दिवस म्हणजेच ‘वसुबारस’ (गोवत्स द्वादशी) शहरात अतिशय मंगलमय आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक श्री. राजीव कीर यांच्या वतीने नूतन नगर येथील मयेकर यांच्या घरी गाय आणि वासराचे मंत्रोच्चाराच्या जयघोषात विधिवत पूजन करण्यात आले.
नगरसेवक राजीव कीर हे गेल्या ७ वर्षांपासून सातत्याने वसुबारस सण अत्यंत उत्साहात साजरा करत असून यंदाही ही परंपरा मोठ्या भक्तीभावाने जपण्यात आली. याप्रसंगी पुरोहित बावा पाटणकर भटजी यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारासह सवत्स धेनूची (गाय आणि वासरू) पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर गाई-वासरांना ओवाळून त्यांना फराळ, केळी तसेच पारंपरिक पद्धतीनुसार धणे आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
भारतीय संस्कृतीत गोधनाला अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या मंगलप्रसंगी सौ. प्राची कीर, सौ. शोभा जिरोळे, सौ. अंजली साळवी, सौ. अरुणा पेटकर, श्री. दिलीप भाटकर, कौस्तुभ नागवेकर, सिद्धेश सुर्वे, मंदार सरपोतदार, सौ. दिव्या अगीने, श्री. दीपक अगीने, श्री. अजित साळवी, दिव्या कीर यांच्यासह स्थानिक नागरिक आणि मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरीत नगरसेवक राजीव कीर यांच्या वतीने पारंपरिक उत्साहात गोपूजन; ७ वर्षांची परंपरा...













