मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात अणसूर ग्रामपंचायत चा जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक!…

लोकसहभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय सहकार्यातून यश : सरपंच सत्यविजय गावडे

वेंगुर्ले : दाजी नाईक
महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६’ अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत अणसूर ने उत्कृष्ट कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीच्या पारदर्शक कारभार, नाविन्यपूर्ण उपक्रम, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा गौरव मिळाला आहे. लोकसहभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय सहकार्यातून हे यश प्राप्त झाले असल्याचे सरपंच सत्यविजय गावडे यांनी सांगितले.

या अभियानादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांची विशेष साथ व मार्गदर्शन लाभले. तसेच पंचायत समिती व जिल्हा स्तरावरून गटविकास अधिकारी माननीय श्री. वासुदेव नाईक, सहायक गट विकास अधिकारी दिनेश पाटकर, कृषी अधिकारी श्री. प्रशांत चव्हाण, विस्ताराधिकारी गुरुनाथ धुरी, सभापती शंकर घारे, उपसभापती श्री. सचिन देसाई, भाजप तालुका प्रमुख पपू परब आणि वेंगुर्ला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी व जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

अणसूर ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांना व विकासात्मक कामांना प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वेंगुर्ला तालुक्यातील सर्व माध्यमांनी केले. त्यांचेही आभार.

गावच्या यशामध्ये ग्रामस्थांचा सर्वात मोठा वाटा
या यशाचे खरे श्रेय आणि मुख्य हक्क अणसूर गावातील समस्त ग्रामस्थांचा आहे. ग्रामपंचायतीच्या प्रत्येक उपक्रमात आणि योजनेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन दिलेले मोलाचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले आहे.
उत्कृष्ट कामगिरी केलेले पथक: या अभियानात ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, सरपंच सत्याविजय गावडे, उपसरपंच वैभव मालवणकर, ग्रामपंचायत सदस्य सीमा गावडे, संयमी गावडे, साक्षी गावडे, वामन गावडे, सुधाकर गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुप्रिया गावडे, सोनू गावडे, डिजिटल मित्र तनवी गावडे, सिद्धेश गावडे, प्राथमिक शाळेचे शिक्षक माळगावकर सर, सामंत सर, राऊत मॅडम, घाटवळ सर, गोडसे मॅडम, आरोग्य समुदाय अधिकारी प्रज्ञा धुरी, अंगणवाडी सेविका भक्ती गावडे, अनिशा गावडे , मदतनिस अन्नपूर्णा गावडे.आणि आशा सेविका अनुष्का तेंडोलकर यांनी अथक परिश्रम घेतले.