चिपळूण (प्रतिनिधी) : हिंदू संस्कृती त गाई ला माता मानले जाते. जिथे गोमातांचे संरक्षण , संवर्धन आणि भक्ती भावाने पूजन होते. तिथे व्यक्ती, समाज आणि राष्ट्राचा उत्कर्ष होतो, असे वैदिक धर्माचे तत्वज्ञान सांगते. याकरिता वसुबारसचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने चिपळूण येथील जांभळेवाडीत गोवत्स पूजन उत्साहात झाले.
हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सहसंयोजक प्रशांत उतेकर आणि त्यांच्या पत्नी अक्षता उतेकर यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले. यावेळी विहीपचे पराग ओक, साईनाथ कापडेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजिंक्य ओतारी, देवव्रत तांबे, भाजपचे महेश शिर्के, ओंकार आयरे, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक अमित जोशी, हेमंत चाळके आदीसह अनेक धर्म प्रेमी हिंदु बांधवानी यावेळी सहभाग घेतला.













