चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबविणाऱ्या संस्कार भारती उत्तर रत्नागिरी या संस्थेतर्फे दीपावलीचे निमित्ताने सोमवार दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळामध्ये दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, वेस मारुती जवळ चिपळूण या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमांमध्ये पणत्या प्रज्वलित करून हा परिसर प्रकाशमय करावयाचा आहे.
याबरोबरच संस्कार भारतीचे ध्येय गीत, शिवछत्रपतींची आरती, आणि संपूर्ण वंदे मातरम म्हणून या कार्यक्रमाची सांगता केली जाईल. तरी सर्व रसिकांनी आणि शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सायंकाळी ६ वाजता एकत्र यावे आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन संस्कार भारती उत्तर रत्नागिरीतर्फे करण्यात येत आहे.













