लक्ष्मीपूजनाच्या आनंदोत्सवात ऑटोमबॉम्ब हातातच फुटला

लक्ष्मीपूजनाच्या आनंदोत्सवात ऑटोमबॉम्ब हातातच फुटला

कणकवलीत २८ वर्षीय तरुण जखमी

कणकवली : लक्ष्मीपूजनाचा उत्सव आणि दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करत असताना फटाके फोडण्याच्या नादात एका २८ वर्षीय तरुणासोबत दुर्घटना घडली. हातातून ऑटोमबॉम्ब फेकत असतानाच तो हातातच फुटल्याने तरुणाच्या हाताला दुखापत झाली. ही घटना रविवारी सायंकाळी कणकवली येथे घडली. या घटनेनंतर जखमी तरुणाला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार केले. सुदैवाने या दुर्घटनेत तरुणाच्या हाताला मोठी किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याने पुढील अनर्थ टळला.