वायंगणी हायस्कूल च्या सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना केले वाटप
आचरा-अर्जुन बापर्डेकर
ज्ञानदीप विद्यालय वायंगणीच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ज्ञानदीप संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष श्री हनुमंत गणेश प्रभू यांनी स्वखर्चाने दिवाळीच्या पुर्वसंध्येला मिठाई वाटप केली त्यावेळी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाबु हडकर मुख्याध्यापक श्री टकले सर, सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते दिवाळी सणाचा आनंद लुटत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता व मोबाईलचा अती वापर टाळुन फटाके न फोडता दिवाळी सणाचा आनंद घ्यावा अशा सूचना अध्यक्षांनी केल्या दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मुलांना मिठाई वाटप करताना ते अध्यक्ष पदावरून मुलांना मार्गदर्शन करत होते.यावेळी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापक टकले सर , चंद्रकांत उर्फ बाबु हडकर, जाधव सर,सौ हळदणकर आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले सुत्र संचलन जाधव सर तर आभार सौ प्रभा हळदणकर यांनी मानले.














