आभार संस्थेच्या वार्षिक सभेत निर्धार
रत्नागिरी : रत्नागिरीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ रत्नागिरी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री विनोद हळदवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री शरदजी गोळपकर श्री प्रविण सावंतदेसाई श्री शंकर उर्फ दादा वाडेकर महिला अध्यक्षा सौ प्रेरणाताई विलणकर यांच्या उपस्थित पटवर्धन हायस्कूल येथे संपन्न झाली
दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करुन व सर्वाचे स्वागत तसेच मागिल सभेचे इतिवृत्त जमाखर्च अहवाल ऑडिट रिपोर्ट वाचून सर्वानुमते मंजूरी घेण्यात आली व पुढिल वर्षाचे अंदाजपत्रक ठरवताना रत्नागिरी जिल्ह्यातील भजनी कलाकारांना एकत्र करून त्यांना व्यासपीठ देण्यासाठी जिल्हास्तरीय भजन संमेलन घेण्यात यावे असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला त्यासाठी श्रीमती राजश्री लोटणकर अध्यक्ष श्री अनंत घाटविलकर उपाध्यक्ष श्री प्रसाद राणे (सचिव) श्री विनायक डोगरे खजिनदार बुवा श्री मिलिंद आरेकर ( उपसचिव) श्री सतोष धनावडे उपखजिनदार श्री सुधीर मिरजुळकर श्री महेश पवार श्री मदन डोर्लेकर,श्री संजय मेस्री, श्री निलेश मेस्री श्री रत्नदीप लिंगायत सौ आकाक्षा वायंगणकर सौ सगीता येलपुला सौ मंदा चौघुले सौ वेदा शेट्ये सौ रेश्मा शिंदे अशी समिती गठित करण्यात आली आहे
यासाठी स्मरणिकाही काढायची ठरविण्यात आली आहे
यावेळी माऊली महिला नमन मंडळातील कलाकारांना मानधन वाटपही करण्यात आले व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा ही देण्णयात आल्या
आपण आपल्या मंडळातील भजनी व इतर कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठीच ही संकल्पना माडण्यात आली आहे यांचे सर्वानीच स्वागत केले महिला मंडळ शाखा रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ व माऊली महिला नमन मंडळ ही अपत्ये आभार संस्थेचीच आहेत आणि या संस्थेमुळेच आम्हाला व्यासपीठ उपलब्ध होत आहे असे उद्गगार श्रीमती लोटणकर यांनी काढले आपल्या सोबत आपली संस्था आहे आणि सर्वांनी स्वताबरोबर संस्थेसाठी योगदान द्यायलाच हवे असे उद्गगार श्री शरदजी गोळपकर यांनी काढले अध्यक्षीय भाषणात या संपूर्ण कार्यासाठी सर्वाचे योगदान लाभले तर संस्थेबरोबर आपलेही नाव मोठे होत असते विविध उपक्रम राबवून आपले नाव ही आपणच उज्वल करू शकतो असे उद्गगार श्री विनोद हळदवणेकर यांनी काढले यावेळी आयडॉल शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री मदन डोर्लेकर गुरुजी व सौ सर्वता चव्हाण विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला
या सर्वाचे आभार सचिव श्री वासुदेव वाघे यांनी मानले













