सिंधुदुर्ग, विजयदुर्गसह छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

वैभववाडी भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा

वैभववाडी प्रतिनिधी
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. अशी घोषणा दिल्या. तसेच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली.

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे. राज्यातील ११ किल्ल्यांमध्ये जिल्ह्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण आहे.

वैभववाडी भाजपाच्या वतीने शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, प्राची तावडे, संजय सावंत, नेहा माईणकर, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, हुसेन लांजेकर व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.